Interview taken by EEWEB

It was a great pleasure to give this news by us that one of our expert faculty was interviewed by the famous technically dedicated magazine of America: The EEWEB MAG.

मी गेल्या ७-८ वर्षांपासून, ७ वी पासून ते इंजीनीरिंग पर्यंतच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना, विद्यासागर अकॅडेमीमध्ये, रोबोटिक्स हा विषय शिकवीत आहे. त्यांच्यामध्ये ह्या विषयाची आवड निर्माण करून विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना शिकविले आहे आणि आजही शिकवीत आहे.

माझ्या आगळ्या वेगळ्या teaching methodology मुळे विद्यार्थ्यांना हा विषय अतिशय सोपा वाटतो. “Less theory, more interesting practicals!” ह्या माझ्या शिक्षण पद्धतीकडे आकर्षित होऊन, दर महिन्याला, शेकडो विद्यार्थी ह्यातील programming logic मध्ये इंटरेस्ट घेतात आणि एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करतात. हे सर्व शिकविताना विद्यार्थ्यांना, रोबोटिक्समधील firmware, hardware, programming तर शिकविल्या जातेच, पण त्यासोबत मी, त्यातील इलेक्ट्रोनिक्सची सुद्धा ओळख करून देतो.

EEWEB magazine
EEWEB magazine

विद्यार्थ्यांना रोबोटिक्स मुळे प्रत्येक गोष्टीत logical solutions शोधण्याची सवय लागते. ह्याचा सखोल परिणाम त्यांच्या शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासावर सुद्धा प्रतिबिंबित होतो आणि त्या विद्यार्थ्याचा, तात्विक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अमुलाग्र बदलून जातो.

गणित आणि विज्ञानासारखे कठीण विषय त्याला सोपे वाटू लागतात कारण त्यातील क्लिष्ट गोष्टींमध्ये तो लॉजिक शोधू लागतो आणि ह्यातूनच त्याचे उत्तम करिअर घडविण्यास अतिशय मदत होते.

हे सर्व सांगण्याचे कारण असे कि, माझ्या इलेक्ट्रोनिक्स आणि रोबोटिक्स विषयातील नवीन प्रकारच्या teaching methodology मुळे, आणि त्यातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या यशामुळे, अमेरिकेतील EEWEB (www.eeweb.com) ह्या मासिकाने माझ्या ह्या कार्याची दखल घेतली.

मागच्या आठवड्यात त्यांनी मला email पाठवून माझा इंटरव्यू घेतला. ह्या मासिकाच्या website वर नुकताच Featured Engineer ह्या शीर्षकाखाली तो प्रकाशित झाला आहे. इंटरव्यू वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि आपला अभिप्राय अवश्य कळवा.

आपल्या अभिप्रायाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. धन्यवाद….! dsvakola@gmail.com

वेबसाईट ची लिंक: https://www.eeweb.com/

संपूर्ण इंटरव्यू वाचण्यासाठी लिंक: https://www.eeweb.com/spotlight/interview-with-dattaraj-vidyasagar

माझ्या वेबसाईट ची लिंक: http://vidyasagarsir.com/