रोबोटिक्स कार्यशाळा

विदर्भातील विद्यार्थ्यांना (सहाव्या वर्गापासून पुढचे सर्व विद्यार्थी) रोबोटिक्स विषयाची गोड़ी निर्माण व्हावी व उच्च शिक्षणासाठी पुणे, मुंबई वगैरे ठिकाणी गेल्यावर त्यांना वेगवेगळ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान स्पर्धांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण व्हावा यासाठी विद्यासागर अकादमी (Vidyasagar Academy, Akola) येथे एक मोफत कार्यशाळा (workshop) घेण्यात येणार आहे.

यामध्ये रोबोटिक्स विषयाशी अनुरूप, उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांना चांगले करिअर कसे घडविता येईल आणि त्यासाठी आतापासूनच कोणती तयारी करता येईल, याची विस्तृत माहिती देण्यात येईल. तसेच काही प्रायोगिक डेमो सुद्धा दाखविण्यात येतील.

तरी इच्छूक विद्यार्थी, पालक आणि टीचर्स यांनी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करावे.

एकूण जागा: ३० फक्त (Limited Seats 30 only)

दिनांक: शनिवार, ११ मार्च २०१९

कार्यशाळेची वेळ: सायंकाळी ५:०० ते ७:०० पर्यंत

सोबत काय आणावे: पेन आणि वही.

स्थळ: विद्यासागर अकादमी, रणपिसे नगर, १२-ज्योतिर्लिंग मंदिराजवळ, सम्यक संबोधी कार्यालयाच्या मागे, अकोला

संपर्क दूरध्वनी: ९९-६०-९९१-९९१

ऑनलाईन रेजिस्ट्रेशन

टीप: हि कार्यशाळा (workshop) पुन्हा एकदा घेण्यात येईल. नवीन तारखेसाठी संपर्क करावा.