Paytm आपल्या मोबाईल वर कसे वापरावे? अतिशय सोप्या भाषेतील माहिती

२०१४ मध्ये सुरु झालेले पेटीएम (Paytm) हे अप्स वापरायला अतिशय सोपे आणि माझ्या विचाराने गृहिणींसाठी सर्वोत्तम अप्स आहे.सध्याच्या काळात भारतामध्ये हे सर्वात जास्त वापरले जाणारे अप्स आहे. मोदिजींच्या म्हणण्याप्रमाणे हे खरोखरीच सर्वांना इ-बटूआ म्हणून पैसे देण्याघेण्यासाठी सहज वापरता येते. ह्या अप्स बद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे Paytm च्या आपल्या online खात्यात जमा झालेली रक्कम सहजपणे आपल्या बँकेच्या खात्यात आपण transfer करू शकतो. त्यावर काहीही surcharge नाही.

हे अप्स डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये Play Store वर जा आणि टाईप करा “Paytm”. खाली दिसणाऱ्या मेनूवर क्लिक करा. अप्स install झाल्यावर open करा आणि विचारलेली सर्व माहिती भरा. हे अप्स वापरायला अतिशय सोपे आहे एकदा तुम्ही ते वापरायला सुरुवात केली कि तुम्हालाच आश्चर्य वाटेल कि हे वापरणे कित्ती सोपे आहे.

हे अप्स तुम्ही आपल्या कम्प्युटर वरूनही आपल्या मोबाईल वर install करू शकता. चला तर मग मित्रांनो हे अप्स डाउनलोड करूया. अधिक माहिती साठी इथे क्लिक करून तुम्ही Paytm च्या वेबसाईट वर जाऊ शकता.

About the author: Admin of Vidyasagar Academy to post all types of educational material required for our students. This material is equally helpful to our online students.

Comments on this entry are closed.