Why you must learn robotics only through Vidyasagar Academy?

तुम्ही शाळेत/कॉलेजात शिकत आहात का…? आणि remote control च्या खेळण्यासोबत खेळत असता का किंवा खेळले आहात का…? मग हे वाचाच…!

Remote control ने चालणाऱ्या खेळण्याला ‘ बुद्धी ’ असते का…? नाही ना…!? ते खेळणे तुमच्या बुद्धीवर किंवा कौशल्यावर नियंत्रित होत असते. तुम्ही जसे चालवाल तसे ते चालते.

समजा तुमच्या जवळ एक remote controlled कार आहे आणि तुम्ही ती remote control च्या मदतीने एका खोलीत चालवीत आहात अशी कल्पना करा. अचानक जर तुमचे नियंत्रण बिघडले तर ती कार सरळ भिंतीवर जाऊन आपटणार ह्यात शंका नाही. असे ‘बिनडोक’ (आणि महागडे) खेळणे काय कामाचे…?

मित्रांनो, त्यापेक्षा तुम्ही robotics का शिकत नाही…? तुम्हाला कल्पना आहे का, कि रोबोटिक्स शिकताना तुम्हाला खऱ्या अर्थाने तर्क (logic) म्हणजे काय ते उमगते, तुमच्या बुद्धीला एक आव्हान मिळते, खाद्य मिळते, तुमच्या विचारांचा कस लागतो.

अगदी साधा रोबोट जरी घेतला आणि तो रोबोट तुम्ही एखाद्या टेबलावर चालत ठेवला (दोन चाकांवर), तर तो टेबलाच्या काठावर आला तरी पडणार नाही, स्वतःला वाचविण्यासाठी तो थांबेल, मागे वळेल आणि पुन्हा पुढे चालत राहील, अशा प्रकारची बुद्धी तुम्ही तुमच्या तर्काचा (logic) आधार घेऊन त्याला देऊ शकता. रोबोटिक्समध्ये, तुमच्या रोबोटने स्वतःचे निर्णय स्वतःच कसे घ्यावेत, हे तुम्ही रोबोटला शिकवू शकता.

आणखी एक, समजा तुमचा रोबोट एका खोलीत चालतोय (दोन चाकांवर) अशी कल्पना करा. खोलीत जागोजागी त्याच्या समोर जे अडथळे येतील त्यावेळी तो त्यातून बरोबर मार्ग काढत पुढे पुढे जात राहील अशी निर्णयक्षमता तुम्ही रोबोटला देऊ शकता.

विद्यासागर अकॅडेमीकडून तुम्हाला दिल्या जाणारी रोबोटिक्स किट असंख्य वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला वापरता येते. त्यासाठी तुम्ही ‘C’ Programming Language मधील प्रोग्राम्स कसे बनवावेत ह्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण तुम्हाला दिले जाते. ह्या रोबोटिक्स किटच्या सहाय्याने तुम्ही काय काय करू शकता हे केवळ तुमच्या कल्पनाशक्तीवरच अवलंबून आहे.

अशा एक ना अनेक वेगवेगळ्या तर्कशुद्ध निर्णयक्षमता (logical ability) तुम्ही आपल्या रोबोटमध्ये विकसित करू शकता. त्यासाठी आम्ही विद्यासागर अकॅडेमीमध्ये रोबोटिक्सचे शास्त्रशुद्ध शिक्षण देतो.

विद्यासागर अकॅडेमीने ‘LEARN ROBOTICS IN EASY STEPS’ हा अभ्यासक्रम, अगदी आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा सहज समजेल, अशा प्रकारे तयार केला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने किमान ६-७ दिवसात हा बेसिक कोर्स तुम्ही शिकू शकता. लक्षात ठेवा, विद्यासागर अकॅडेमी मध्ये शिकविल्या जाणाऱ्या रोबोटिक्सचा अभ्यासक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दरवर्षी किमान १००० पेक्षा जास्त विद्यार्थी (८ वी ते बी. इ. फायनल) आमच्या अकॅडेमीमध्ये हा कोर्स शिकून जातात.

ह्याशिवाय रोबोटिक्स शिकल्यावर तुमच्या उच्च शिक्षणात त्याचा तुम्हाला खूप उपयोग होतो. उज्वल भवितव्य घडविण्यासाठी सध्याच्या गतिमान आणि आधुनिक जगात, रोबोटिक्स सारखे दुसरे शिक्षणच नाही. म्हणून मित्रांनो, आता तरी सावरा आणि उगीच निर्बुद्ध खेळण्यांसोबत खेळण्यात आपला अमूल्य वेळ आणि पैसा वाया घालवू नका.

अधिक माहिती साठी आमचे खाली दिलेले पत्रक पहा.

robotics study club

Front side of robotics study club brochure

robotics study club

Back side of robotics study club brochure