Bifocal Electronics (बायफोकल इलेक्ट्रोनिक्स) विषयाचे महत्व

Bifocal Electronics (बायफोकल इलेक्ट्रोनिक्स) विषयाचे महत्व नेमके काय आहे हे समग्रपणे सांगणार हा लेख लिहिलंय प्रा. विद्यासागर सर ह्यांनी…! विद्यार्थी मित्रांनो, हा लेख निट वाचून ह्यातील प्रत्येक गोष्टीचे मनन करा…!

– विद्यासागर अकादमी

 

बायफोकल इलेक्ट्रोनिक्स हा विषय हा विषय, १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत, अतिशय महत्वाचा आहे आणि ह्या विषयाच्या मदतीने तुम्ही engineering college मध्ये खूप चांगले करिअर घडवून आपले भविष्य उज्वल बनवू शकता. कारण व्होकेशनल इलेक्ट्रोनिक्स हा अभ्यासक्रम engineering college मधल्या काही महत्वाच्या अभ्यासक्रमांचा पाया आहे.

मित्रांनो, बायफोकल इलेक्ट्रोनिक्स फक्त प्रक्टिकलचे १०० मार्कस मिळवण्यासाठी आहे आणि मग थिएरीत जे काय मिळतील, त्या सगळ्यांची गोळाबेरीज करून engineering मध्ये admission घेण्यासाठी हा विषय आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला कोणी सांगत असेल, तर ते चुकीचे आहे, हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा!

उच्च माध्यमिक बोर्डाने हा विषय, २००० साली revise केला. Advanced and modern applied sciences च्या सखोल अभ्यासासाठी मदत व्हावी, ह्या दृष्टीने ह्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली. अतिशय विचारपूर्वक आणि दूरगामी परिणाम साधणारे असे ह्या विषयाचे syllabus आहे. शिवाय engineering college च्या काही विशिष्ट अभ्यासक्रमात, दुसऱ्या सत्रापासूनच ११वी आणि १२वी च्या इलेक्ट्रोनिक्सच्या syllabus चा अंतर्भाव केला होतो.

मुख्यतः E&TC, Electrical, Computers, Instrumentation, Electronics, Power Electronics, Industrial Electronics, इत्यादी च्या अभ्यासक्रमात अगदी दुसऱ्या सत्रापासूनच ११वी आणि १२वी इलेक्ट्रोनिक्स अभ्यासक्रमाचा ८०% भाग अभ्यासात असतो. त्यामुळे इलेक्ट्रोनिक्सचा विद्यार्थी ह्या संधीचा चांगला फायदा घेऊ शकतो. पण त्याने ११वी व १२वीत इलेक्ट्रोनिक्सचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.

Engineering college मध्ये अगदी दुसऱ्या सत्रापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरु होते. त्यात pcb, circuits, projects, seminars, robotic competitions, kits, job work, programming, microcontroller, remote controlling, Android OS, Simbian OS, simulation, अशी विविध शब्दावली विद्यार्थ्याच्या कानावर पडायला लागते.

ह्या सगळ्याचा संबंध मग DMM, FG, CRO, power supply, regulators, opamps, integrator, differentiator, controller, comparator, sensors, modulation, QAM, FSK, gates, TTL, CMOS, Mux, Demux, registers, flip-flops, hex code, coding, encoder, decoder, LAN, A/D-D/A conversion, इत्यादी topics शी जोडलेला असतो.

मग विद्यार्थ्याला आठवते कि अरे, विद्यासागर सरांच्या notes मध्ये हे सर्व काही दिलेले आहे, पण तेंव्हा आपण अभ्यास केला नाही. ठीक आहे. आता करू….!!!

पण आता तयारी करण्यासाठी उशीर झालेला असतो, एका वर्षापूर्वी शिकवलेले topics आठवून तयारी करणे कठीण असते, कारण त्यावेळी, त्या topics चा नीट समजून अभ्यास केलेला नसतो. अगदी January महिन्याच्या शेवटी त्याला जाग आलेली असते.

त्यामुळे सखोल वगैरे तर दूरच, अगदी दोन्ही paper मिळून २५-३० मार्क मिळाले तरी पुष्कळ झाले असे त्याने मनाशी ठरवलेले असते – त्याचबरोबर आपल्याला college मधून प्रक्टीकालचे ९५ च्या खाली तर मार्क मिळणारच नाहीत, हेही त्याला माहिती असते – पण इकडे अचानक engineering college च्या submission, seminar, competitions, वगैरे च्या dates येतात आणि मग विद्यार्थी गडबडून जातो.

मला असे बरेच विद्यार्थी भेटतात. आपल्या difficulties घेऊन माझ्याकडे येतात, कधीकधी फोनवरच विचारतात,

सर, असा असा प्रॉब्लेम आहे, आता काय करू…?

कोणते पुस्तक refer करू…??

एकदम easy होईल असे सांगा सर….म्हणजे मला पटकन समजेल…

सर, तुमच्या notes पाहिजे…!

तुमच्या website वरून download करू का? लिंक देता का? …वगैरे, वगैरे.

अशा विद्यार्थ्यांनाही मी योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, करतो आहे. पण अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना engineering college च्या ‘rat race’ मध्ये टिकणे कठीण होऊन जाते. काही प्रामाणिक विद्यार्थी cope-up करतात.

पण माझ्या व्यक्तिगत माहितीप्रमाणे साधारणतः १५% विद्यार्थी, अशा परिस्थितीत, engineering च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात DC होतात, घरी परत येतात आणि मग B.Sc. किंवा B.C.A. किंवा चक्क कॉमर्सला admission घेतात. पण हेही courses काही सोपे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा attitude, ११वी/१२वीतच बदलणे आवश्यक आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

परंतु जर विद्यार्थ्याने व्होकेशनल इलेक्ट्रोनिक्स विषयात प्रामाणिकपणे तयारी केली असेल तर त्याला ह्या सर्व (वर सांगितलेल्या) terminology ची माहिती असते, त्याची बेसिक तयारी झालेली असते आणि त्याचा उपयोग करून त्याला engineering चे syllabus सोपे वाटते, आपले करिअर engineering college च्या माध्यमातून तो तयार करू शकतो. सेमिनार चांगल्याप्रकारे present करू शकतो, स्वतः प्रोजेक्ट बनवू शकतो, programming वगैरे करू शकतो.

ह्या सर्व activities मुळे (third year च्या) कॅम्पस इंटरव्यू मध्ये selection सोपे होते, चांगले job placement आणि package मिळते आणि परिणामी तो चांगले career तो घडवू शकतो.

अर्थातच ह्याकरिता त्याला ११वी-१२वी पासूनच व्होकेशनल इलेक्ट्रोनिक्स आणि modern technology ची सांगड घालून योग्य प्रशिक्षणही मिळावयास हवे आणि त्यातून त्याने ह्या संधीचा योग्य फायदाही घ्यायला हवा.

व्यक्तीशः १०वीच्या विद्यार्थ्यापासून अगदी थेट, engineering वगैरे आटोपून job करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांशी माझा contact आहे. B.E./M.E./MBA करून job करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मिळणारे feedback मी नेहमी ११/१२वी च्या विद्यार्थ्यांना सांगत असतो.

नवीन technology, smart phones, internet इत्यादी मध्ये developments काय काय आहेत, ह्याची त्यांना माहिती देत असतो. माझ्या website वर त्याबद्दल updated articles लिहित असतो.

तात्पर्य असे कि, व्होकेशनल इलेक्ट्रोनिक्सच्या विद्यार्थ्याला हा विषय आणखी सोपा व्हावा, त्यामध्ये गोडी निर्माण व्हावी आणि त्याचा applied approach वाढीस लागावा हीच सदिच्छा…!

विद्यासागर सरांनी काळजीपूर्वक लिहिलेल्या बायफोकल इलेक्ट्रोनिक्स विषयाच्या सर्वोत्कृष्ट नोट्स!

बायफोकल इलेक्ट्रोनिक्स विषयाच्या सर्वोत्कृष्ट नोट्स!
विद्यासागर सरांनी काळजीपूर्वक लिहिलेल्या नोट्स!
अवघ्या महाराष्ट्रात गाजलेल्या नोट्स!
अतिशय माफक किमतीत उपलब्ध आहेत.
त्वरित ऑर्डर करा आणि लगेच लागा अभ्यासाला…!
About the author: Admin of Vidyasagar Academy to post all types of educational material required for our students. This material is equally helpful to our online students.

Comments on this entry are closed.